घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वीस रुपयांवरून चाकू हल्ला

वीस रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या ३८ युवकाने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी येथे गेले असता आरोपीने त्यांच्याकडे २० रुपये मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. आरोपीने खिशातील चाकू काढून फिर्यादीच्या गळ्यावर आणि मानेला वार केला.

तसेच उपस्थित नागरिकांना चाकू दाखवत धमकावत दहशत माजवली. “तुम्हा सर्वांना खल्लास करीन” अशी धमकी देत आरोपीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें