घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम

पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली.या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले.

एकूण १४ खेळाडू, संघव्यवस्थापक आणि मार्गदर्शकांसह महापालिकेच्या दोन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.सदर संघात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, अग्निशामक विभाग, सुरक्षा विभाग, पाणीपुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षण मंडळ, क्रीडा विभाग, कीटकनाशक विभाग आणि उद्यान विभाग अशा विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.

विभागनिहाय एकत्रित सहभागामुळे या विजयाला अधिक व्यापक आणि प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले.अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महापालिका ‘अ’ संघाने जबरदस्त खेळ कौशल्य सादर करत पुणे शहर पोलीस संघाचा २-० असा धुव्वा उडवला.

संघातील कर्णधार सुहास नाईक, उपकर्णधार दशरथ वाघोले, सोमनाथ वीर, विजय गांगुर्डे, अजय घोगरे, संस्कार चव्हाण आणि अंकुश लोहकरे यांनी उत्कृष्ट खेळी करून संघाची ताकद अधोरेखित केली.तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका ‘ब’ संघाने देखील भक्कम कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळवला.

‘ब’ संघात हरिभाऊ साबळे, सोमनाथ मोरे, राजवैभव महजराव, हर्षद कदम आणि घनश्याम कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. दोन्ही संघांना क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांनी केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन यशप्राप्तीमध्ये महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे, महापालिकेने या अंतरकचेरी स्पर्धेत सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवत ऐतिहासिक कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन्ही संघांनी दाखवलेला जिद्द, संघभावना आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडू आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन.’— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें