घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी लाकूड किंवा गोवऱ्याचा वापर करून होळी पेटवली जाते, परंतु अनधिकृतपणे झाडे तोडणे किंवा जाळणे हा गुन्हा मानला जातो. पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्षतोड करत असल्यास किंवा झाडांना हानी पोहोचवल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

महापालिकेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ अंतर्गत असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. नागरिकांनी होळी सणाच्या निमित्ताने झाडांची तोड करू नये, असे आवाहनही विभागाने केले आहे.

ज्या ठिकाणी वृक्षतोड किंवा झाडांचा नाश होत असल्याचे दिसले, त्या प्रकरणी तक्रार करण्यासाठी १८००१०३०२२२ या क्रमांकावर कॉल करता येईल, व्हॉटसअॅपद्वारे ९६८९९००००२ या क्रमांकावर किंवा ऑनलाइन [www.complanit.punecorporation.org](https://www.complanit.punecorporation.org) या संकेतस्थळावर नोंद करता येईल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें