घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जिजामाता स्कूलमध्ये विविध उपक्रम

येथील राजगड ज्ञानपीठाच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यूनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी (ता. २८) मराठी भाषा दिन विविध व अनोख्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला.

मराठी कवींच्या कवितांचे चार्ट तयार करून कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण करून दाखवले. विविध वस्तूंचा वापर व वेशभूषा करून मराठी सणांचे महत्त्व पटवून दिले. मराठी महिने दिनदर्शिका व चार्ट तयार करून आणि त्याचे ऋतूनुसार असणारे महत्त्व सुद्धा सांगण्यात आले. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, पुस्तक या गोष्टी स्वतः विद्यार्थ्यांनी नाटकामध्ये पात्र म्हणून प्रदर्शित केल्या आणि त्यांचं महत्त्व व आजची दशा यावर सुंदर नाटक सादर केले. ज्यामध्ये ही पात्र एकमेकांशी संवाद करतानाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला.

मराठी संस्कृती प्रदर्शित करणारे विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. मराठी भाषा गौरव म्हणून विविध मराठी ग्रंथाचे पूजन व वाचन करण्यात आले. मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी म्हणून मराठी भाषेतील लेखन व वाचन या विषयांवर प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.मुख्याध्यापिका रुबिना सय्यद यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थी व शिक्षकांनी हे उपक्रम राबविले.

या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांसह पालक आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिल्पा बुदगुडे, कविता शिंदे, दीपाली खामकर आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अनंतराव थोपटे, अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे, सचिव स्वरूपा थोपटे, उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे कौतुक केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें