घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

पिंपरी शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सर मध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.सुमारे 391 दुचाकीवर कारवाई करत सायलन्सरवर बुलडोजर फिरवला असून, दंड वसूल केला आहे. ही कारवाई वाहतूक पोलिसांनी केली आहे.

नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

२०२५ मध्ये अशा प्रकारच्या १४,५९२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १,५४३ प्रकरणांमध्ये कारवाई करून १८ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, २४ फेब्रुवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत वाहतूक शाखेअंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध वाहतूक विभागांकडून बुलेट सायलन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३६८ बुलेट सायलन्सर जप्त करण्यात आले.

यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या सायलन्सरसह एकूण ३९१ सायलन्सर निकामी करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून, नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावर्कर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. वाहतूक विभागातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें