घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल

सलग तीन अधिवेशनात गैरकारभाराचे वाभाडे निघत असतानाही पुणेकृषी उत्पन्न बाजार समितीमधील कारभाराला लगाम लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता नव्याने काढलेल्या ई-निविदांमध्ये उपसभापती यांच्या स्वाक्षरीचा स्थळ पाहणी अहवाल अनिवार्य केल्याने टेंडर प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही अट ठराविक व मर्जीतल्या ठेकेदारांना लाभदायी ठरणार असल्याची जोरदार चर्चा बाजार वर्तुळात रंगली आहे.मुख्य बाजार आवारातील गेट क्रमांक १ जवळील पार्किंग, नवीन फुलबाजारासमोरील ट्रक पार्किंग, प्रवेशद्वार क्र. ३, भुसार विभागातील सर्व्हिस लेन, लोढा बिल्डिंगमागील पार्किंग, शिवनेरी रोडवरील पे अँड पार्किंग तसेच नो-पार्किंगमधील दुचाकी वाहने उचलण्यासाठी कामगारांसह टेम्पो भाडेतत्त्वावर घेणे अशा एकूण पाच ई-निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांतील अटी जाचक व संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्य शासनाने ई-निविदांमध्ये विशिष्ट अटी न घालण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असताना बाजार समितीने मात्र उपसभापती सहीची अट घालून शासनाच्या आदेशांनाच हरताळ फासल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.

त्यामुळे टेंडर आधीच ठरलेले तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकार्‍यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्राद्वारे ई-निविदांमध्ये सर्वसाधारण अटी ठेवण्याचे निर्देश दिले होते. तरीही उपसभापती स्वाक्षरीचा स्थळ पाहणी अहवाल जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अट काढून टाकावी, तसेच निविदांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संचालक प्रशांत काळभोर यांनी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत बाजार सिमतीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.कोणाचीही अडवणूक केली जाणार नाहीठेका मिळाल्यानंतर भविष्यात क्षेत्रफळ कमी असल्याचे कारण देत पैसे कमी करण्याची मागणी ठेकेदाराने करू नये यासाठी स्थळ पाहणी अहवाल ठेवला आहे. स्थळ पाहणी अहवालावर सही घेण्यासाठी कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें