पुणे प्रतिनिधी : शांताराम लांघे
सिंहगड किल्ला परीसर हा जंगलाने व्यापलेला भाग असून पाऊस काळी मनमोह निसर्गरम्य, सौंदर्याने नटलेला परिसर दिसतो.मात्र उन्हाळ्यात चित्र वेगळे दिसले. उन्हाळा जोरास वाढल्याने जंगलात गवत,पालापाचोळा पडलेला आहे.यामुळे लगेच जंगल पेट घेते.यामुळे काही समाजकंटक लोक जाणुनबुजून आग लावतात. दि.२७/२/२०२६रोजी सिंहगड किल्ला परीसरात दुपारी सांबरे वाडी, थोपटे वाडी येथे येण दुपारी आग लागली.या आगीने रौद्ररूप धारण करून सारं जंगल भस्म होऊन गेले.आग विझविण्यासाठी वनविभाग, वनसंरक्षण समिती घेरा सिंहगड कर्मचारी गणेश सांबरे, शिवाजी लांघे, शंकर सांबरे, अनिल जोरकर, संदिप सांबरे, शंकर डोंगरे, रमेश खामकर,इत्यादींनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र विफल ठरले.भर दुपार,वाराचा वेग यामुळे सुरक्षा कर्मचारी हतबल झाले. संध्याकाळी हुशीरा आगीवर नियंत्रण ठेवण्यास यश प्राप्त झाले व वनवा विझवला.
त्याचं दिवशी चार वाजता सिंहगड घाट रस्ता आग लावण्यात आली. तब्बल एक तासात आग आटोक्यात आणली.एकीकडे वनविभाग वनसंरक्षण समिती कर्मचारी जीवाचे रान करुन संकोल आगीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करतात दुसरीकडे कडे जाणुनबुजून समाजकंटक आग लावण्याचे चिन्ह दिसून येत होते.एका वेळेस चार ते पाच ठिकाणी आग लावण्याचे घटना घडल्या.रात्री हुशिरा वनविभाग वनसंरक्षण समिती कर्मचारी वनरक्षक बळीराम वायकर, संदिप कोळी, शांताराम लांघे, नितीन गोळे, उत्तम खामकर, निलेश पायगुडे, धनराज सांबरे, निलेश सांगळे,विंकी दुधाने यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.वनसंपदा वाचवण्यास यश आले.











