घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

धक्कादायक गाठी काढण्याऐवजी गर्भाशय काढले; डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खासगी रुग्णालयातील चार डाॅक्टरांविरुद्ध मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी खासगी रुग्णालयातील चार डाॅक्टरां विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता १२५ (ब), ३ (५) अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने हडपसरमधील मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत. त्यांचे ब्युटी पार्लर आहे. २०२३ मध्ये त्यांनी चाचणी (सोनोग्राफी) केली. तेव्हा गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे निदर्शनास आले होते.उपचारासाठी त्यांना १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील एका खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.

सोनोग्राफी चाचणी अहवालच्या आधारे डाॅक्टरांनी गर्भाशयातील गाठ लेझर शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें