घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लक्ष्मीनगरमधील वाहन तोडफोड करणाऱ्या गुंडावर पोलिसांचा धिंड

येरवडा यथील लक्ष्मीनगर परिसरात दहशत माजवून गाड्यांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुंडाची शुक्रवारी ( दि. 27) पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईमुळे वाहन तोडफोडीच्या घटनांना आळा बसला असून, परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पोलिसांनी 22 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.

सुलतान रहमान शेख (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या गुंडाचे नाव आहे. तपासासाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शेखविरुद्ध यापूर्वी 22 गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत माजवण्यासाठी त्याने लक्ष्मीनगरमधील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या ठावठिकाण्याची माहिती लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

सुलतानने वाहने फोडण्याचे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक रहिवासी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याने जेथे वाहनांची तोडफोड केली होती त्याच लक्ष्मीनगर परिसरातून पोलिसांनी त्याची धिंड काढली. तसेच, त्याच्याविरुद्ध नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें