पुणे (दि. 28 फेब्रुवारी 2026):अमर एज्युकेशन सोसायटी संचलित, एस.पी. इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव पठार, पुणे येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य सायन्स एक्झिबिशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय श्री. आकाश उनेचा (हेड ऑफ टाकळकर अकॅडमी) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. अरुणभाऊ सोकांडे तसेच संस्थापिका सचिव माननीय सौ. मंगलताई सोकांडे उपस्थित होत्या.या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, पर्यावरण, ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, आरोग्य तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स यांसारख्या विषयांवर विविध आकर्षक व उपयुक्त प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांचे सविस्तर स्पष्टीकरण देत उपस्थित पालक, शिक्षक व पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.सौर उर्जेवर चालणारी उपकरणे, पाण्याचे शुद्धीकरण मॉडेल, कचरा व्यवस्थापन प्रणाली, स्मार्ट सिटी संकल्पना आणि स्वयंचलित यंत्रणा हे प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी संस्थेच्या सचिव सौ. मंगलताई सोकांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजची मुले म्हणजे उद्याचे शास्त्रज्ञ, संशोधक आणि नवोन्मेषक आहेत. त्यांच्या कल्पकतेला योग्य दिशा आणि संधी दिल्यास ते देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकतात. सायन्स एक्झिबिशनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतात. प्रत्येक मुलात काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते, फक्त ती ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.”कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अमर सोकांडे सर आणि मुख्याध्यापिका माननीय सौ. पल्लवी सोकांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, संशोधन वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे. मेहनत, चिकाटी आणि सतत शिकण्याची तयारी ठेवली तर यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











