घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दक्षिण पुण्याचा कायापालट करणारा 20 किमीचा ‘मेगा प्लॅन’ तयार, कुठून-कसा असेल मार्ग?

दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. महामेट्रो कडून शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान मेट्रो मार्गिका विस्ताराचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.सर्व मंजुऱ्या आणि सर्वेक्षण प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास 2030-31 पर्यंत ही मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान सुमारे 20 किलोमीटर लांबीची उन्नत (Elevated) मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार असून वाहतूक कोंडीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचा विस्तार

हा प्रस्तावित विस्तार हिंजवडी (Hinjawadi) ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेच्या पुढील टप्प्याचा भाग असल्याचे सांगण्यात आले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारला जात असून आयटी हब आणि शहराचा मध्यवर्ती भाग यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

कोंढवा-येवलेनगर काम थेट महामेट्रोकडून

कोंढवा-येवलेनगर या दरम्यानचे काम थेट महामेट्रोकडून हाती घेण्यात येणार आहे. या मार्गावर अतिरिक्त ‘स्पर’द्वारे Undri पर्यंत विस्तार करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे कोंढवा, येवलेवाडी, येवलेनगर आणि उंड्री या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांना मेट्रोची जोड मिळणार आहे.

कॅम्प आणि पुलगेट मार्गे जोडणी

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला कॅम्प आणि पुलगेट मार्गे जोडण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे शहराच्या जुन्या व मध्यवर्ती भागाला दक्षिणेकडील उपनगरांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवाशांसाठी पर्यायी आणि जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रस्तावित मार्गिकेला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), पर्यावरणीय व तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें