पुणे, दि. २ मार्च २०२६ :
Pune Metro ने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकांवरील तिकीट तपासणीच्या (AFC) गेट प्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून हा नवा नियम मंगळवार, ३ मार्च २०२६ पासून लागू होणार आहे.
काय आहे नेमका बदल?
आतापर्यंत मेट्रो स्थानकांवरील गेट्स उघडी असायची. प्रवाशांनी तिकीट स्कॅन केल्यावर हिरवा दिवा लागायचा आणि ते आत जाऊ शकत होते. मात्र, आता ही पद्धत बदलण्यात आली आहे.
आता नवीन पद्धत कशी असेल?
सर्व गेट्स आधीपासूनच बंद असतील.
प्रवाशांनी QR कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट मशीनवर स्कॅन केल्यानंतरच गेट उघडेल.
प्रवासी आत गेल्यानंतर गेट आपोआप पुन्हा बंद होईल.
तिकीट नसल्यास गेट उघडणार नाही. मेट्रो प्रशासनाच्या मते, या बदलामुळे शिस्त वाढेल, महसूल गळती थांबेल आणि स्थानकांवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल.
धूलीवंदन निमित्त सेवा अर्धा दिवस बंद
३ मार्च २०२६ रोजी धूलीवंदन सणामुळे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद राहणार आहे.
सकाळी ६:०० ते दुपारी ३:०० – सेवा बंद
दुपारी ३:०० ते रात्री ११:०० – सेवा नियमित सुरू
प्रवाशांनी सणाच्या दिवशी प्रवासाचे नियोजन वेळेत करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. प्रवाशांसाठी सूचना स्टेशनवर येताना तिकीट तयार ठेवा. मोबाईलवरील QR कोड स्पष्ट दिसेल याची खात्री करा. गेटसमोर अनावश्यक गर्दी करू नका.











