घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मोशीत नात्याला काळिमा फासणारा क्रूर हल्ला

मोशी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून संतापलेल्या एका व्यक्तीने आपल्याच मेहुणीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला.

कौटुंबिक अडचणीत असलेल्या स्वतःच्या पत्नीला आणि मुलाला आश्रय दिला, याच रागातून आरोपीने हे क्रूर कृत्य केले. या हल्ल्यात ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून आरोपीने जाताना तिचे मंगळसूत्र आणि मोबाईलही पळवून नेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिलेने आपल्या बहिणीला आणि तिच्या मुलाला राहण्यासाठी स्वतःच्या घरी जागा दिली होती. मात्र, ही बाब बहिणीच्या पतीला (आरोपी) मान्य नव्हती. पत्नी आणि मुलाला सासरी का ठेवले, यावरून त्याच्या मनात मेहुणीबद्दल राग होता. शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी पावणे आठच्या सुमारास आरोपीने देहू-आळंदी रस्त्यावरील मोशी येथील मेहुणीच्या घरात शिरून वाद घातला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने लोखंडी रॉडने महिलेच्या पायावर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, महिलेच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही आरोपीला तिची दया आली नाही.

त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून घेत घटनास्थळावरून पळ काढला.जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें