घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘तू भंडारा लाव नाही तर गुलाल…’ मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; धनंजय मुंडे समर्थकांशी वाद चिघळणार?

करमाळा (जि. सोलापूर) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांना थेट आव्हान देत जोरदार इशारा दिला. “तू भंडारा लाव नाहीतर गुलाल… मी मरायला भीत नाही,” असे ठणकावत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“धमक्या देऊ नका, थेट या!”

गेल्या आठवड्यात मुंडे समर्थक गोविंद फड यांनी जरांगे पाटील यांना धमकी दिल्याची चर्चा होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, “मी माझ्या समाजाला देव मायबाप मानलं आहे. माझं कुटुंब डावावर लागलं तरी मी मागे हटणार नाही. धमक्या देऊ नका, करायचं असेल तर समोर या.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“मराठा समाज सज्ज आहे” जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “राज्यातल्या प्रत्येक गावात माझा मराठा आहे.” “मी १५ मिनिटांत मदत पोहोचेल अशी यंत्रणा उभी करतोय.” “आरक्षण चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत टिकणार.” ते पुढे म्हणाले की, चार-पाच दिवसांत ते राज्यभरातील दौरे एक वर्षासाठी बंद करून संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. “शेतकऱ्यांचं कर्ज ठेवत नाही.” “पीक विमा, दुधाचे दर आणि मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी लढणार.” “लढाई जिंकायची असेल तर चिकाटी हवी,” असे सांगत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.

मोफत शिक्षण आणि सगेसोयऱ्यांचा मुद्दा जरांगे पाटील यांनी सर्व जातींच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला.

“मी जातीवादी असतो तर फक्त मराठ्यांसाठी मागणी केली असती. पण मी सर्वांसाठी लढतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर हरकतींची छाननी सुरू असून, लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. “नाही केलं तर त्यांच्या मागे लागणार,” असा इशाराही त्यांनी दिला. राजकीय वातावरण तापणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समर्थक आणि विरोधकांमध्ये नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या वादावर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें