घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सर्जिकल नाकाबंदीत’ १८ वर्षीय मुलाची थरारक सुटका

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ (ता.भोर) मध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या एका थरारक अपहरण प्रकरणाने संपूर्ण परिसराला अक्षरशः हादरवून सोडलं. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाला भरदिवसा कारमधून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि काही क्षणांत गावात भीतीचं सावट दाटून आलं.पण काही तासांतच पोलिसांनी उभारलेल्या ‘सर्जिकल नाकाबंदी’मुळे चित्र पालटल आणि युवकाची सुखरूप सुटका झाली.

क्षणात घडलेलं अपहरण, गावात खळबळ

दुपारचा नेहमीसारखा गजबजलेला वेळ. कापूरहोळच्या मुख्य रस्त्यावर अचानक एक काळी गाडी थांबते. काही क्षणांची झटापट. आणि युवकाला जबरदस्तीने गाडीत बसवून वाहन भरधाव वेगाने निघून जातं. हा प्रकार इतक्या झपाट्याने घडला की परिसरातील लोक स्तब्ध झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश पसरवण्यात आला आणि गावागावातून सतर्कतेचे सायरन वाजू लागले.

‘ऑपरेशन नाकाबंदी’ – रस्ते सीलबंद

माहिती मिळताच पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन आणि नीरा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाईला सुरुवात केली. जेऊर-नीरा मार्गावर तात्काळ नाकाबंदी उभारण्यात आली. प्रत्येक वाहनाची तपासणी, प्रत्येक संशयित हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं. दरम्यान, जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेत भरली. पोलिसांनी अडवण्याचा इशारा करताच चालकाने वेग वाढवला. पाठलाग सुरू झाला. धुळीचे ढग उडू लागले. रस्ता अरुंद होत गेला. आणि अचानक गाडीचा ताबा सुटला.

उसाच्या शेतात गाडी अडकली; आरोपी फरार

भरधाव वेगात असलेली कार उसाच्या दाट शेतात घुसली आणि चिखलात अडकली. क्षणभरात वातावरण तणावपूर्ण झालं. अपहरणकर्त्यांनी अंधार आणि दाट उसाच्या पिकाचा फायदा घेत पळ काढला. मात्र पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीपर्यंत धाव घेतली. कारचे दरवाजे उघडताच आत भीतीने थरथरणारा युवक आढळला. त्याला सुरक्षित बाहेर काढत पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

कटामागील गूढ काय?

या अपहरणामागे नेमकं कारण काय?

खंडणीचा डाव होता का?

आर्थिक व्यवहारातील वाद?

की वैयक्तिक वैरातून रचलेला कट?

२ आरोपी ताब्यात

कापुरहोळ येथील युवकाचे अपहरणकर्त्यांना पोलीसांनी ऊसातून बाहेर डोंगरांमध्ये पकडण्यात यश आले आहे. अक्षय लक्ष्मण इंगुळकर, अक्षय दत्तात्रय भालेराव दोघे राहणार मांजरी हडपसर यांना ताब्यात घेतले असून फरार आरोपी पंकज वाल्हेकर, गणेश धाडवे राहणार कामथडी यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें