घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला

अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, विशेष गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागात नियमित गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी (क्रमांक ११२) किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान, शहरात सुमारे १२० ते १२५ इराणी नागरिक वास्तव्यास आहेत. पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि शैक्षणिक व्हिसावर ते पुण्यात आले आहेत. काही इराणी महिलांनी भारतीय नागरिकांशी विवाह केला असून, अशा सुमारे २५ ते ३० महिला शहरात वास्तव्यास आहेत. तसेच, ६० इराणी विद्यार्थी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत.

इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्यास ती वाढवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.

संबंधित विद्यार्थी आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून व्हिसा मुदतवाढ प्रक्रियेस सहकार्य केले जाणार असल्याची माहिती विशेष शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें