घेरा सिंहगड भागातील काही परिसरात ऐतिहासिक ठिकाण व गड दैवत ठिकाण आहे. ही गड दैवत अतिप्राचीन व पुर्वीपासून अस्तित्वात आहे. हक्केला धावणारे नवसाला पावणारी जुनी अशी देवस्थानांची ख्याती दुरवर आहे. ही देवस्थान अती प्राचीन, पुर्वीपासून आहेत.या ठिकाणी यात्रा,उत्सव कधी असतात या ठिकाणी कोणते देवस्थान आहे. हे जरी स्थानिक ग्रामस्थांना व जवळील गावांतील लोकांना माहीत असले. तरी बाहेरून येणाऱ्या बर्याच नागरिकांना पर्यटकांना यांची माहिती नसते. येथील ऐतिहासिक ठिकाणांची गडदैवतांची माहिती व्हावी. यासाठी दि.३/३/२०२६रोजी या दिवशी गड किल्ले संवर्धन संस्थेने या संकल्पनेतून हे फलक लावण्यात आले आहे.
या फलकावरती सदर देवस्थान ठिकाण कुठले आहे, ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व काय आहे. हे सर्व या माहिती दर्शक फलकावरती दिले आहे. या मुळे किल्ले सिंहगड व घेरा परिसरात आपला दैदीप्यमान इतिहास सर्वाना समजेल. अशी अपरिचित माहिती गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांनी माहिती दर्शक फलकाच्या माध्यमातून लोंकासमोर आणली आहे.
यामुळे हे गड दैवत आहे.अती प्राचीन आहे ऐतिहासिक महत्त्व यात्रा, उत्सव यांची माहिती फलकांवर आहे यामुळे भाविक भक्तांना माहिती मिळेल, देवस्थान कुठले कुठे आहे याचे मार्गदर्शन होईल. असे गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक मा.श्री साईनाथ जोशी यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी खामगाव मावळचे मा.उपसरपंच श्री प्रशांत दारवडकर, बाप्पुजी बुवा देवस्थानचे पुजारी श्री.जावळकर उपस्थित होतेया मोहिमेत सिंहगड विभाग प्रमुख श्री शांताराम लांघे, उत्सव प्रमुख श्री दत्ता बंडू जोरकर, श्री गणेश भुसेकर, श्री जीवन बराटे, श्रीकांत लांघे सहभागी झाले होते.












