घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा

लोहगाव वाघोलीमध्ये अनधिकृत इमारती उभ्या राहात असताना महापालिकेने कारवाई केली नाही. पण चार-पाच मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्यानंतर बुधवारी त्यांच्यावर जॉ कटरने या इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत.या इमारतींमधील सदनिका विकल्या गेल्या आहेत की नाही याबाबत मात्र प्रशासन अंधारात आहे.

पुणे महापालिकेच्या अनधिकृत अतिक्रमण व बांधकाम निर्मूलन विभागातर्फे लोहगाव, वाघोलीत कारवाई सुरु करण्यात आली. यामध्ये १८ इमारतींना महापालिकेने नोटीस बजावून या सर्व इमारती पाडून टाकल्या. यामध्ये तब्बल ७८ हजार चौरस फूट इतक्या क्षेत्रफळ असलेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.

यात काही भाग हा पत्रा शेडचा देखील आहे. त्याचप्रमाणे निको गार्डन परिसरातील रामेश्वर कॅफे, सांबर हॉटेल, गणपती मंदिर चौक येथेही कारवाई करून ६ हजार ५०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम, शेड काढून टाकण्यात आले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. २० मनपा पोलिस, ७० एमएसएफ जवान, १५ जेसीबी, १५ गॅस कटर, १५ ब्रेकर, ३० साहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, १५ अतिक्रमण निरीक्षक आणि २०० बिगारी सेवक तैनात करण्यात आले होते.

सामान्य नागरिकांची होते फसवणूक

उपनगरांमध्ये अनधिकृत इमारती बांधून त्यातील सदनिका, दुकाने नागरिकांना विकले जातात. पैशाची अडचण असल्याने नागरिक ही इमारत अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे तपासत नाहीत. पण ज्यावेळी महापालिकेकडून अशा बहुमजली इमारतींवर कारवाई केली जाते. त्यावेळी सामान्य नागरिकांचे घर तर जातेच पण लाखो रुपयांची फसवणूक होते. त्यांची आयुष्याची पुंजी सदनिकेसोबत जमीनदोस्त होते. यात संबंधित बिल्डरचे काहीही नुकसान होत नाही. पुण्यात असे प्रकार यापूर्वी नऱ्हे, आंबेगाव भागात घडले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें