घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेंट, स्टील पुरवठ्यासाठी भांडवली गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका दांपत्याची तीन कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने (वय ४२, रा. कृषितंत्र विद्यालय परिसर, मांजरी बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे. संतोष सुरेश काकडे (रा. राहीज वस्ती, लोणी काळभोर) आणि अतुल शामराव पवार (रा. खिलारवाडी, नळस्टॉप, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १४ सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२४ या कालावधीत लोणी काळभोर परिसरात घडला. आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या पतीला पुणे मेट्रो कंपनीला सिमेंट आणि स्टील पुरवठ्यासाठी भांडवली गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

गुंतवणुकीवर मोठा नफा व खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन देत त्यांनी टप्प्याटप्प्याने तीन कोटी ७८ लाख रुपये स्वीकारले.मात्र, एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही दांपत्याला कोणताही नफा किंवा परतावा दिला नाही.

पैशांची मागणी केली असता आरोपींनी तक्रारदारावरच खोटा सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे दस्तऐवज आणि बँक व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें