घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘यूएई’मध्ये अडकले पुण्यातील १०२ पर्यटक

आखातामधील तणावपूर्ण परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विमान वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पुण्यासह राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत.त्यांना तातडीने पुण्यात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी ‘ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ पुणे’ने (टॅप) केंद्र सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

विमानांची उड्डाणे रद्द होणे, मर्यादित आसन उपलब्धता आणि वाढलेले विमानभाडे यामुळे अनेक प्रवाशांना देशात परतता येत नसल्याने त्यांच्यात आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉटेलमधील वाढलेला मुक्काम आणि दैनंदिन खर्चामुळे संबंधित कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे.

त्यामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत.’टॅप’चे सदस्य गिरीकंद ट्रॅव्हल्सचे ३०, विहार ट्रॅव्हल्सचे २४, ऑलिव्ह ट्री टुरिझमचे ८, ॲडोना हॉलेडजचे २२, के फोर हॉलिडेजचे ६, डी ट्रॅव्हल- एएसके हॉलिडेजचे २ आणि देवम टूर्स ॲंड ट्रॅव्हल्सचे ८ प्रवासी सध्या आखातात अडकले आहेत.या सर्व प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी अतिरिक्त विमान उड्डाणांची व्यवस्था करावी, तसेच नागरी उड्डाण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि यूएई प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी मागणी ‘टॅप’चे अध्यक्ष नीलेश भन्साळी यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पाठविण्यात आल्या आहेत.आमच्या सदस्यांचे महाराष्ट्रातील १०२ प्रवासी सध्या अडकले आहेत.

त्यांना विमान उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही विमान कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. तसेच केंद्र सरकारकडेही प्रयत्न सुरू आहेत. हवाई वाहतूक विस्कळित झालेली असल्याने प्रवासावर निर्बंध आहेत. तरीही केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्याला यशही येत आहेत. अडकलेले सर्व प्रवासी येत्या एक- दोन दिवसांत परततील, अशी आशा आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें