घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

सातारा महामार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी दरी पुल परिसरात आज गुरुवारी दुपारी एक भीषण साखळी अपघात झाला. भरधाव कंटेनरने नियंत्रण सुटल्यानंतर समोर असलेल्या तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.या घटनेत सात ते आठ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सातारा दिशेकडून पुण्याकडे येणारा कंटेनर अचानक नियंत्रणाबाहेर गेला. उतार असलेल्या या घाट रस्त्यावर कंटेनरने पुढे असलेल्या चारचाकी वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, चार कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांच्या काचा फुटल्या, तर गाड्यांचे सुटे भाग रस्त्यावर विखुरले गेले. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातानंतर स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि प्रवाशांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, तर बहुतेक किरकोळ जखमी आहेत.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांची मोठी कोंडी लागली. पोलिस आणि वाहतूक पथकाने घटनास्थळावरील वाहने बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरळीत केली. मात्र, अपघातग्रस्त परिसरात अजूनही काही प्रमाणात वाहतूककोंडी कायम आहे.

अपघातांचा ‘हॉटस्पॉट’

पुणे-सातारा महामार्ग हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखला जातो. नवले पुल आणि जांभुळवाडी दरी पुल परिसरात उतार, वळण आणि वेगामुळे असे अपघात वारंवार घडतात. पोलिसांनी अपघाताचे कारण तपास सुरू केले असून, कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें