घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आंबेगाव बु. परिसरातील नागरिकांना रेशनकार्ड मिळण्यात विलंब; पुरवठा विभागावर चौकशीची मागणी

पुणे : आंबेगाव बु. परिसरातील अनेक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्डसाठी अर्ज करूनही त्यांना आजतागायत रेशनकार्ड मिळाले नसल्याची तक्रार समोर आली आहे. याबाबत अँटी करप्शन बोर्ड ट्रस्ट, नवी दिल्लीचे नॅशनल जॉइंट सेक्रेटरी श्री. चंद्रकांत काकासाहेब मोरे यांनी हवेली तालुक्यातील पुरवठा विभागाकडे लेखी विनंती अर्ज करून चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव बु. परिसरातील काही नागरिकांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्डसाठी अर्ज केले होते. त्यानंतर हवेली तहसील कार्यालयातील एक खिडकी योजनेत आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करण्यात आली. मात्र, चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित नागरिकांना रेशनकार्ड मिळालेले नाही.

सदर नागरिकांनी पुरवठा विभागाच्या कार्यालयात वारंवार चौकशी केली असता “अर्ज प्रक्रियेत आहे” असे सांगितले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही ठिकाणी दलालामार्फत रेशनकार्ड काढून देण्याचा प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ नंतर किती रेशनकार्ड मंजूर करण्यात आले, तसेच त्यामध्ये कोणती प्रक्रिया अवलंबली गेली याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात पुरवठा विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित नागरिकांच्या अर्जांची तपासणी करावी आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास लवकरात लवकर रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें