घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जलनियोजनाकडे दुर्लक्ष झाल्यास २०३१ नंतर राज्यात भीषण पाणीटंचाई

राज्यात भूपृष्ठ व भूगर्भ अशा दोन्ही स्रोतांचे जलनियोजन अर्धवट झाले आहे. त्यामुळे सिंचन व्यवस्था विस्कळित झाली आहे. शहरीकरणामुळे पुढे पाण्याची मागणी अजून वाढेल. परिणामी, शेतीसिंचनासमोरील संकट अजून गडद होऊ शकते.

जलनियोजनाकडे आणखी दुर्लक्ष झाल्यास २०३१ नंतर राज्य भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभे असेल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.’वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट’ व पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून संयुक्तपणे गुरुवारी (ता. ५) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.

व्यासपीठावर ट्रस्टचे राज्य प्रमुख हेमंत पिंजण, तज्ज्ञ सफदर अली, प्रकल्प व्यवस्थापक तिलकचंद कटरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले होते.

पिंजण म्हणाले, ‘पाणी नसल्यास स्वच्छतेशी निगडित समस्या वाढतील. सरकारी पातळीवर यासाठी अनेक उपाययोजना चालू आहेत. मात्र सर्व उपाय पाणीसाठा वाढविण्याशी निगडित आहेत. प्रत्यक्षात उपलब्ध पाणी, मागणी, नेमकी गरज आणि योग्य वापर या मुद्दांकडे दुर्लक्ष झाले आहे.’

स्वच्छतेच्या उपक्रमांत समुदाय दुर्लक्षितजलनियोजन व स्वच्छतेची सांगड घालणाऱ्या राष्ट्रीय सरकारी धोरणाची वाटचाल अली यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘सरकारी अभियानांमधून देशभर शौचालये बांधली. पण, योजनेचे यश केवळ संख्येवर मोजले गेले. मात्र, त्याचा वापर, देखभालीचे मुद्दे दुर्लक्षित राहिले.

जलपुरवठ्याच्या सरकारी उपक्रमांमध्येही तेच झाले. किती नळ आले, किती टाक्या बांधल्या यावर यश पाहिले गेले.परंतु, पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. पाणी व स्वच्छताविषयक आजपर्यंत राबवलेले सर्व उपक्रम, अभियान चांगले होते. परंतु, त्यात समुदायाचा सहभाग अल्प होता. लोकसमुदायाकडे दुर्लक्ष झाल्याने या उपक्रमांना वर्तणूक बदलाद्वारे अपेक्षित असलेला पाठिंबा मिळालाच नाही.’

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें