घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘आयआयटीएम’ आणि बिकानेर तंत्रज्ञान विद्यापीठात करार

देशासाठी आता एक विश्वासार्ह राष्ट्रीय हवामान डेटाबेस तयार होणार असून, त्यामुळे हवामान बदलाचे अचूक मॉडेलिंग आणि दीर्घकालीन हवामान प्रवृत्तींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ (आयआयटीएम) आणि राजस्थानमधील ‘बिकानेर तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात तब्बल ५० वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारामुळे हवामान बदलाचे अचूक मॉडेलिंग, दीर्घकालीन हवामान प्रवृत्तींचा सखोल अभ्यास, धोरणनिर्मितीसाठी भक्कम वैज्ञानिक आधार आणि भारताच्या ‘अर्थ सिस्टीम मॉडेल’ची क्षमता अधिक सक्षम होणार आहेत.’आयआयटीएम’चे संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव आणि बिकानेर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अखिल रंजन गर्ग यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या वेळी ‘आयआयटीएम’च्या ‘सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुवर्णा फडणवीस, डॉ. अनुप महाजन, बिकानेर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे डॉ. गणेश पी. प्रजापत आणि डॉ. ऋतुराज सोनी उपस्थित होते. हवामान बदलासंदर्भातील संयुक्त संशोधनास प्रोत्साहन देणे आणि विविध हवामान घटकांचे दीर्घकालीन निरीक्षण करणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें