घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे मेट्रोच्या रुळावर ‘ती’च्या कर्तृत्वाचा वेग

रविवारची सुट्टी असल्याने प्रवाशांची तशी लगबग कमी होती. सकाळी साडेसातला माझी ड्यूटी सुरू होणार असल्याने मी वेळेपूर्वीच स्थानकावर दाखल झाले. मेट्रोच्या केबिनमध्ये बसले आणि साडेसात वाजताच मेट्रो वनाज ते रामवाडी मार्गावर धावू लागली.स्थानकावर आज सगळीकडेच महिलांचा वावर होता. हे चित्र पाहून मीदेखील मनोमन आनंदले.

मेट्रो चालविणे हे दररोजचेच काम, पण आज मात्र महिला असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत होती मेट्रोची ट्रेन ऑपरेटर प्राजक्ता ठाकरे.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेट्रो प्रशासनाने रविवारी (ता. ८) दोन्ही मार्गांवर प्रत्येकी चार स्थानकांचे कामकाज महिलांच्या हाती सोपविले. यात मेट्रोचे सारथ्य देखील महिलांच्या सक्षम हाताने केले.

रविवारी सकाळपासूनच विविध मार्गांवर मेट्रोचे संचालन महिलांनी केले. तांत्रिक कौशल्याची जोड देत अत्यंत आत्मविश्वासाने या महिलांनी मेट्रोचे सारथ्य केले.रुळांवर धावणारी ही मेट्रो आज केवळ प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवत नव्हती, तर महिलांच्या प्रगतीची साक्ष देत होती. सुरक्षा रक्षकापासून ते मेट्रोचे स्थानक नियंत्रकापर्यंत सर्वच मेट्रोच्या रुळावर ‘ती’च्या कर्तृत्वाचा वेग जबाबदाऱ्या महिलांनी लीलया सांभाळल्या.

मेट्रोच्या आठही स्थानकांवर आज खऱ्या अर्थाने ‘महिलाराज’ दिसून आले.स्थानक नियंत्रणातही महिलांचा पुढाकारकेवळ मेट्रो चालवणेच नव्हे, तर स्थानक नियंत्रक (स्टेशन कंट्रोलर) म्हणूनही महिलांनी कार्यभार सांभाळला. स्थानकावरील तांत्रिक यंत्रणा हाताळणे, प्रवाशांना मार्गदर्शन करणे आणि संपूर्ण स्थानकाचे व्यवस्थापन पाहणे अशा सर्व जबाबदाऱ्या महिलांनी यशस्वीपणे पार पाडल्या.

या स्थानकावर होते ‘महिलाराज’ मार्गिका एक- पिंपरी-चिंचवड मनपा स्थानक- संत तुकारामनगर स्थानक- नाशिक फाटा स्थानक- शिवाजीनगर स्थानकमार्गिका दोन- एसएनडीटी महाविद्यालय स्थानक- पीएमसी स्थानक- रुबी हॉल क्लिनिक स्थानक- रामवाडी स्थानकमहिला समाजाचा खरा आधारस्तंभ आहेत. त्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने आठ स्थानकांचे संचालन महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवून त्यांच्या कर्तृत्वाला अधोरेखित केले आहे. महिला सक्षमीकरणाला यामुळे चालना मिळेल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें