इंफाळ, मणिपूर | प्रतिनिधी
गुरुकुल स्पोर्ट्स क्लबची गुणवंत खेळाडू वैष्णवी पवार हिने क्रीडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे. इंफाळ, मणिपूर येथे २०२६ साली पार पडलेल्या ६९व्या शालेय राष्ट्रीय क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत वैष्णवीने अफलातून कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत वैष्णवी पवार हिने ओव्हरऑल गोल्ड मेडल, वैयक्तिक गोल्ड मेडल आणि संघ गोल्ड मेडल जिंकत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे गुरुकुल स्पोर्ट्स क्लबसह संपूर्ण राज्याचा नावलौकिक वाढला आहे.
वैष्णवीच्या या यशामागे तिचे सातत्यपूर्ण परिश्रम, कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जात आहे. लहान वयातच राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश तिच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीची नांदी मानली जात आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वैष्णवी पवारचे सर्वत्र अभिनंदन होत असून, क्रीडा प्रेमी, प्रशिक्षक, संस्था आणि पालकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भविष्यातही वैष्णवी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











