घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील घटना वाचून अंगावर येईल काटा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पुणे पोलिसांनी आपला फास आवळला आहे.

पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

गुरुवारी ५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० च्या सुमारास एक वृद्ध महिला धायरी येथील डी.एस.के. गेटजवळील गणपती मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. यावेळी एका अनोळखी महिलेने त्यांना वाटेत गाठले. मला कामाचे पैसे मिळाले आहेत, असे सांगत तिने वृद्ध महिलेशी जवळीक साधली. यानंतर तिला गप्पांमध्ये गुंतवले. हा संवाद सुरू असतानाच, आरोपी महिलेने मोठ्या हुशारीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची चैन काढून घेतली आणि तिथून पसार झाली.

यानंतर काही वेळाने वृद्ध महिलेला गळ्यातील चैन गायब झाल्याचे समजले. तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या पीडित महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तपासासाठी दोन विशेष पथके तैनात केली होती. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवली.

चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली

या तपासादरम्यान निष्पन्न झाले की, हा गुन्हा खानापूर येथील दिपाली गणेश जावळकर (३७) हिने केला आहे. पोलिसांनी तातडीने खानापुरातील तालुका हवेली येथे धाड टाकून दिपालीला ताब्यात घेतले. सुरुवातीला दिपालीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतरच्या अधिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेली २ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन पोलिसांनी जप्त केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें