घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

समाजाच्या जडणघडणीत महिला पत्रकारांचे योगदान

‘विविध क्षेत्रांत महिला कर्तृत्व गाजवत आहेतच, पण पत्रकारितेच्या आव्हानात्मक क्षेत्रातही महिला मागे नाहीत. कुटुंब आणि पत्रकारितेचा समतोल साधून समाजाच्या विविध घटकांचा निर्भिडपणे आवाज उठवत आहेत.समाजाच्या जडणघडणीत महिला पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे,’ असे प्रतिपादन महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आणि ‘फिक्की फ्लो’च्या पुणे चॅप्टरतर्फे विविध वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांमधील महिला पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात नागपुरे बोलत होत्या.पत्रकार भवनातील या कार्यक्रमाला फिक्की फ्लोच्या अध्यक्षा अनिता अग्रवाल, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवराज चोले, डॉ. सिमरन जेठवानी, तेजस्विनी थिटे उपस्थित होते.

नागपुरे म्हणाल्या, ‘महिलांना आता समान संधी मिळत असून, त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. या प्रवासात त्यांना पुरुषांचीही खंबीर साथ मिळत आहे. महिला पत्रकार घर आणि कार्यालय यांचा समतोल राखत आपली जबाबदारी धीरोदात्तपणे पार पाडत आहेत.

अग्रवाल यांनीही महिलांच्या उपजत कौशल्याचे कौतुक करत भविष्यात त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. पाटील यांनी महिला पत्रकारांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.चैत्राली माजगावकर-भंडारी यांनी महिला पत्रकारांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा घेतल्या. तनिष्का डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें