घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

टोलनाक्याजवळ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पतीसोबत टेम्पोमधून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्‍याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पळ काढला. ही घटना सोमाटणे टोलनाका परिसरात शनिवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

आसिफ सलीम (३९, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पतीसोबत टेम्पोमधून काळेवाडी येथे जात होत्या. सोमाटणे टोलनाका परिसरात आरोपीने त्यांच्या वाहनाजवळ येत महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें