घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दृष्टिहीनांसाठी नितीन देसाईंचे कार्य पुढे नेऊ

दृष्टिहीन नागरिकांसाठी स्व. नितीन देसाई यांनी केलेल्या संवेदनशील कार्याचा वसा पुढे चालविण्याची जबाबदारी आपल्यावर असून ती समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू,” असे प्रतिपादन दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी केले.

दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जन्मतः दृष्टिहीन असूनही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारी शक्ती-अंतर्दृष्टी विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आला.

त्यामध्ये गायिका व शिक्षिका दीपमाला लोहाडे, सामाजिक कार्यकर्त्या सकीना बेदी, उद्योजिका रुक्मिणी राजपूत आणि बीटवाईज कंपनीच्या प्रबंधक दिव्या थोरात यांचा सन्मान करण्यात आला.शिकारपूर सोशल फाउंडेशन, रोटरी इंटरनॅशनल क्लब ३१३१ आणि हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला कायनेटिक इंजिनिअरिंग ग्रुपच्या संचालिका डॉ. जयश्री अरुण फिरोदिया, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर आणि निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापक संचालिका मीरा बडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. अर्चना पंडित यांनी स्वागत, तर क्रांती शहा यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती मालुसरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें