घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सकाळ चित्रकला NIE स्पर्धेला पाचगणीत उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये रंगली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता

पाचगणी प्रतिनिधी – प्रमोद रांजणे

कागदावर उतरलेले रंग, रेषांमधून साकारलेली स्वप्नं आणि बालमनांची मुक्त उधळ सकाळ दैनिक समूहाच्या वतीने आयोजित NIE भव्य चित्रकला स्पर्धेने विद्यानिकेतन हायस्कूल, पाचगणी येथे संपूर्ण परिसर रंगमय केला. महाबळेश्वर तालुक्यातील तसेच पाचगणी परिसरातील विविध शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यानिकेतन हायस्कूलच्या प्रशस्त व स्वच्छ प्रांगणात ही स्पर्धा शिस्तबद्ध वातावरणात उत्साहात पार पडली. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, देशभक्ती, निसर्गसौंदर्य आणि बालविश्व अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पक व रेखीव चित्रे साकारली.

रंगसंगती, विषयमांडणी आणि बारकाव्यांनी अनेक चित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक अथर्व बिरामणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सकाळ समूहाचे विजय सुतार, मुख्याध्यापिका ज्योती परदेशी, पत्रकार रविकांत रांजणे, तसेच शिक्षकवृंद आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अथर्व बिरामणे म्हणाले, “कला ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व घडवणारी शक्ती आहे. मोबाईल व डिजिटल युगातही विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेला विसरू नये.

सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास ठेवल्यास कला आयुष्यात मोठी उंची गाठू शकते.” मुख्याध्यापिका ज्योती परदेशी यांनी सकाळ दैनिकाच्या उपक्रमाचे कौतुक करत, “अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपक्रम प्रेरणादायी आहेत,” असे सांगितले. दरवर्षी राज्यभर हजारो विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेची संधी देणारी ही स्पर्धा पाचगणीत विशेष उत्साहात पार पडली. रंग, रेषा आणि कल्पनांच्या संगमातून घडलेली ही कला मेजवानी उपस्थितांसाठी लक्षवेधी ठरली. पाचगणीच्या थंड हवेत यंदा रंगांची ऊब अधिकच जाणवली… आणि त्या रंगांतून घडली उद्याच्या कलाकारांची नवी ओळख!

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें