घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

१२ मार्च रोजी आरोग्य सेनेचा ३१ वा वर्धापन दिन

१२ मार्च १९९५ रोजी मावळ तालुक्यातील बेडसे या छोट्याशा खेड्यात पाच सहकाऱ्यांच्या साक्षीने मी आरोग्य सेनेची स्थापना केली आणि आज आरोग्य सेना एक राष्ट्रीय संघटनेच्या रूपात उभी आहे. “वेदनेवर फुंकर आणि अन्यायावर प्रहार” हे ब्रीद घेऊन हजारो आरोग्य सैनिक आसेतू हिमालय आणि देशाबाहेरही आपत्तीच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून गेले आहेत आणि यापुढेही असेच जात रहातील.

यावर्षीही आरोग्य सेनेने पंजाबमधील पूरग्रस्त भागात मदत आणि वैद्यकीय सहाय्याची मोहीम राबवून संकटात सापडलेल्या बांधवांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. देश जोडण्याचे हे काम आहे. आरोग्य सेनेची भूमिका केवळ आपत्तीपुरती मर्यादित नाही. देशातील लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता , सामाजिक आर्थिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांच्या रक्षणासाठीही आरोग्य सेना ठामपणे उभी आहे. कारण समाजाचे खरे आरोग्य फक्त शरीराचे नसते; सार्वजनिक आरोग्य म्हणजेही सर्व काही नसते, तर ते सामाजिक, राजकीय आणि लोकशाही मूल्यांचेही आरोग्य महत्वाचे असते.

आरोग्य सेनेचे आपत्ती कालीन वैद्यकीय काम, सार्वजनिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय आरोग्याच्या प्रश्नांसाठी दिलेले असंख्य लढे, सर्वसामान्यांना अल्प दरात दर्जेदार औषधे देणाऱ्या जनलोक मेडिकल्सची साखळी, अल्प दरात रोगनिदान सुविधा देणारे जनलोक डायग्नॉस्टिक सेंटर, पुरोगामी जनगर्जना हे गेली १३ वर्षे अव्याहत चाललेले मासिक, १३ वर्षे चाललेला आणि जगातील एक मोठे नाव बनलेला स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव, लोकनेते भाई वैद्य युवा नेता, प्राचार्या नलिनीताई वैद्य समाजाभिमुख शिक्षक असे प्रतिष्ठित पुरस्कार, लोकनेते भाई वैद्य गरजू गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती, लोकनेते भाई वैद्य अकादमी, प्रबोधन सभागृह अशा अनेक उपक्रमांचे जाळे केवळ आरोग्य सैनिकांच्या निःस्वार्थ, समर्पित वृत्तीमुळे उभे राहिले आहे. आरोग्य सेना पुरोगामी संघटना आणि चळवळींच्या मागेही भक्कमपणे उभी राहिली आहे.

आरोग्य सैनिकांमुळेच आरोग्य सेना आज या उंचीवर उभी आहे. तुमच्यासारखे निष्ठावान सैनिक आणि हितचिंतक यांच्या बळावर उभी राहिलेली ही चळवळ पुढेही अशाच जोमाने धावत राहील, याची मला खात्री आहे. डॉ. अभिजित वैद्यसंस्थापक राष्ट्रीय प्रमुख, आरोग्य सेना

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें