घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सोमेश्वर कारखान्याने ऊस गाळप, अनुदानाबद्दल केलेल्या घोषणेवर शेतकरी कृती समितीचा आक्षेप

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने कोट्यवधी रुपये खर्च करून विस्तारवाढ केली. कारखान्याने चालू गळीत हंगामात १० मार्चपर्यंत सुमारे १२ लाख ११ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

फेब्रुवारीत येणाऱ्या उसाला १००, मार्च महिन्यात २०० आणि एप्रिलमधील उसाला ३०० रुपये टन अनुदान जाहीर केले होते. मात्र, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच कारखाना बंद होणार असल्याने एप्रिल महिन्यातील अनुदान कोणाला मिळणार, असा सवाल शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केला.

कारखान्याचे अध्यक्ष उसाच्या गाळपाबाबत व अनुदानाबाबत पोकळ घोषणा करून सभासदांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.राज्यात साखर, रिकव्हरी आणि अल्कोहोल विक्रीतून कारखान्यांना फायदा होत आहे. मात्र, प्रसिद्धीसाठी अनुदानाची घोषणा करून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला. फेब्रुवारीमध्ये सभासदांचा २ लाख ६३ हजार टन ऊस गाळपासाठी आला. १०० रुपये प्रतीटन याप्रमाणे सुमारे २ कोटी ६३ लाख रुपये अतिरिक्त मिळाले. मात्र, तोडणी वाहतूकदारांकडून प्रति एकर ४ ते ८ हजार रुपये घेतले.

मार्च महिन्यात आतापर्यंत सुमारे ६५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. उसासाठी २०० रुपये प्रमाणे १ कोटी ३० लाख रुपये अतिरिक्त मिळाले आहेत. परंतु तोडणीसाठी ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागत आहेत हे काकडे यांनी निदर्शनास आणून दिले. संचालक मंडळाने फेब्रुवारी व मार्चमध्ये गाळपास आलेल्या उसाचे तोडणी वाहतूकदारांनी घेतलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच फेब्रुवारीपासून गाळपास आलेल्या उसास २०० रुपये व मार्च महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास ३०० रुपये अनुदान देण्याची मागणी काकडे यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें