घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर बस जळून खाक

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती मंदिरासमोर शुक्रवारी (ता. १३) रात्री साडे आठच्या सुमारास धावत्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागला आणि बस जळून खाक झाली.संजय ट्रॅव्हलची बस पुणे येथून नागपूरकडे निघाली होती. रांजणगाव गणपती मंदिरासमोर बसमधून अचानक धूर निघत असल्याचे चालक आणि प्रवाशांच्या लक्षात आले.

संभाव्य धोका ओळखत चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. दरम्यान, काही क्षणांतच बसने पेट घेतला आणि आग वेगाने पसरली आणि परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.बसला लागलेल्या आगीमध्ये बसमधील काही प्रवाशांच्या बॅगा जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने प्रवासी वेळेत खाली उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान,बसला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड, शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रात्रीची वेळ असल्यामुळे वाहनांची गर्दी असल्यामुळे अग्निशामक दल आणि पोलिसांना पोहचण्यास उशिर झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवले. बसला लागलेली मोठी आग आणि स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. शिवाय, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. परंतु, रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

तरुणाईची हुल्लडबाजी…

बसला आग लागल्यानंतर तरुणाईने रस्त्यावर येत मोबाईलमधून शुटिंग करत वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण केला होता. शिरूरकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक कोंडी झाल्यामुळे अग्निशामक दल आणि पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाला. आग्निशमक दलाची गाडी लवकर पोहचली असती तर आग लवकर आटोक्यात आणता आली असती. परंतु, हुल्लडबाजीमुळे अग्निशामक दलाची गाडी आणि पोलिसांना पोहचण्यास उशिर झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली तर रांजणगाव पोलिसांनी नागरिकांना बाजूला करत एका बाजूची वाहतूक सुरळीत केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें