घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल, 29 वर्षांपूर्वीचा त्रास उद्भवल्याने शस्त्रक्रिया

भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पायाच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कुस्ती खेळताना 29 वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीचा त्रास पुन्हा उद्भवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचं सुचवलं.त्यानुसार मोहोळ यांच्या पायावर ही शस्त्रक्रिया पार पडलीय. परिणामी आता त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणारे.

मुरलीधर मोहोळ यांनी आजारपणाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली

यदरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आजारपणाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिलीय. मोहोळ यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर येथे 29 वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत आणि या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली. मात्र इतकी वर्षे या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता 29 वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला होता. त्यामुळे शेवटी डॉक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं मला सांगितलं. त्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात आली,” असं त्यांनी सांगितलं आहे.

संसदेचं अधिवेशन सुरू असताना पायाची शस्त्रक्रिया

‘शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणालेत की, “खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही मला पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन आणि कामानिमित्त होणारा देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क आणि इतर कामे. तसंच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय,” अशा भावनाही मंत्री मोहोळ यांनी बोलून दाखवल्या आहेत.

दरम्यान, “मला माहीत आहे की, तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरात पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेत हजर होईन, तेही पहिल्यापेक्षा जास्त जोमाने,” असा विश्वासही मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलाय.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें