घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तेल व गॅस वितरकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे – महेश गुप्ता

पुणे : भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी – पुणे शहर यांच्या वतीने सर्व तेल व गॅस ऑपरेटर कंपन्या, वितरक व एजन्सींना शासनाने निर्धारित केलेल्या धोरणे व मार्गदर्शक सूचनांनुसारच गॅस व इंधनाचे वितरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यवसाय तसेच उद्योग क्षेत्राला नियमित, पारदर्शक आणि सुरळीत पुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहरचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी व्यक्त केले.

घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी (हॉटेल, उद्योग इ.) गॅस व इंधनाचा योग्य आणि नियमानुसार पुरवठा होणे आवश्यक असून, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे ही सर्व वितरकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच अवैध साठेबाजी, कृत्रिम तुटवडा निर्माण करणे किंवा काळाबाजार यांसारखे प्रकार आढळल्यास संबंधित एजन्सी व जबाबदार व्यक्तींविरुद्ध प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही सर्व वितरकांची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही महेश गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें