घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खोलीकरणामुळे वाढणार पाणीपातळी

परिंचे (ता.पुरंदर) गावच्या पाणलोट क्षेत्रात भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून बंधारा खोली करणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. खोलीकणारमुळे परिसर पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुष्कराज जाधव व जलदूत समन्वयक सागर काळे यांच्या हस्ते नारळ फोडून खोलीकरणास प्रारंभ करण्यात आला. खोलीकरणामुळे बंधाऱ्यात साठलेला गाळ काढल्यास मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढणार आहे. भूजलपातळी सुधारण्यासाठी मदत होणार आहे.भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण जबाबदारी समजून कंपनीच्या वतीने दोन पोकलेन यंत्रांच्या माध्यमातून परिंचे परिसरातील गुळूमदरा, नाथ डोंगर, हरणी महादेव डोंगर आदी ठिकाणच्या पन्नासहून अधिक बंधाऱ्यांचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे.

जलसंधारणाच्या कामांमुळे भविष्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी, शेतीला बळ देण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत पुष्कराज जाधव व्यक्त केले आहे.

कार्यक्रमासाठी उद्योजक पप्पू काळे, अमित काळे, लपतळवाडी सरपंच रवींद्र मोरे, अजित नवले आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी नरसिंह नानगुडे, मिलिंद दुधाळ, स्वप्नील जाधव, श्रीपाद गुरव, शांताराम घारमळकर, सोमनाथ गिरमे, श्यामकांत जाधव आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें