घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

किरकोळ भांडणातून मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर एकाची हत्या

मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक घटना घडली आहे. धारधार शस्त्र पोटात खोपसून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अलोक सिंग असं मृत् व्यक्तीचं नाव असून किरकोळ भांडणतून ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघेही प्रवासी होते. लोकलमधून उतरताना भांडण झाल्याने हा प्रकार घडला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

चाकू हल्ल्यामध्ये आलोक सिंग यांच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोक सिंग असं मृत् व्यक्तीचं नाव असून किरकोळ भांडणतुन हत्या झाल्याची माहिती आहे. दोघेही प्रवासी होते. लोकल मधून उतरताना भांडण झाल्याने हा प्रकार घडला आहे. मृतक व्यक्ती विलेपार्ले येतील एन.एम(NM) कॉलेजमध्ये प्रोफेसर होता. प्रोफेसर आलोक सिंग विलेपार्ले मधून ट्रेन पकडून मालाड रेल्वे स्टेशनवर उतरले होते.ट्रेन मधून उतरताना शेजारच्या व्यक्तीला धक्का लागला याच रागाचा भरामध्ये त्या व्यक्तीने प्रोफेसर वर चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यामध्ये आलोक सिंग यांच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून रेल्वे पोलिसांकडून cctv च्या आणि तांत्रिक तपासाचे आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, लोकलमधून उतरताना दोघांमध्ये भांडण झाले होते. यावरुनच त्यांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर मालाड रेल्वे स्टेशनवर एकाची धारधार शस्त्र पोटात खोपसून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती एनएम कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. ते विलेपार्लेहून येत होते आणि मालाड स्टेशनवर उतरत असताना त्यांचा एका अज्ञात व्यक्तीशी वाद झाला आणि त्याने त्याच्यावर चाकूने वार करुन हत्या केली दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें