घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे जिल्ह्यातील पहिले ‘एआय’ साक्षर पोलीस ठाणे

दैनंदिन पोलिसींग मध्ये ‘ए-आय’ची(कृत्रिम बुद्धिमत्ता)वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स कुठे आणि नेमकी कशी वापरायची आणि त्यासाठीचे ‘प्रॉम्ट’ नेमके कसे द्यायचे याचे प्रशिक्षण नुकतेच शिक्रापूर पोलिस दलातील ३५ अधिकारी-कर्मचा-यांनी घेतले.

हे प्रशिक्षण येथील पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या विशेष पुढाकाराने झाले. असे प्रशिक्षण घेणारे शिक्रापूर पोलिस ठाणे हे जिल्ह्यातील पहिले पोलिस ठाणे ठरले आहे.

या प्रशिक्षणामुळे दैनंदिन कामातील तब्बल ५० टक्के वेळ सध्या वाचायला सुरवात झाली असून येत्या महिनाभरात प्रशासकीय कामाचा सुमारे ९० टक्के वेळ वाचण्यापर्यंत आम्ही जावू शकतो, असा दावा पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केला आहे.

बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना, पोलीस दलापुढेही अनेक आव्हाने उभी आहेत. त्यातच वाढती गुन्हेगारी दर, त्याच्या तपासाची जबाबदारी, एफआयआर लिहिणे, बंदोबस्त-अटक-न्यायालयीन प्रक्रीया यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी पूर्ण व्यस्त असतो. मात्र त्याच्या मदतीला ए-आय कसे येवू शकते त्याचे एक दिवशीय प्रशिक्षण येथील ३५ अधिकारी-कर्मचारी यांनी घेतले. हे पूर्ण मोफत प्रशिक्षण येथील एएसएन कॉंप्यूटर एज्युकेशनचे प्रा.सुधीर मुळे यांनी व सानिका कराळे यांनी दिले.

या प्रशिक्षणात कार्यालयीन कामकाज अधिक जलद, अचूक आणि प्रभावी कसे करता येईल, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन पोलीस कामकाजात उपयुक्त ठरणाऱ्या ChatGPT, Google Gemini, Google Lens आणि Canva, यासारख्या विविध १७ प्रगत एआय-टूल्सची माहिती यावेळी देण्यात आली.

अहवाल लेखन, गुंतागुंतीच्या माहितीचे विश्लेषण, फोटो व व्हिडिओ एडिटिंग, भाषांतर आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सानिका कराळे यांनी सादर केले. ‘डीपसीक’ (DeepSeek) आणि ‘क्विलबॉट’ सारख्या साधनांचा वापर करून तपासातील तांत्रिक बाबी कशा सुलभ करता येतील, यावरील तांत्रिक प्रात्यक्षिकांचा या प्रशिक्षणात विशेष समावेश करण्यात आल्याने सहभागी अधिकारी-कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती प्रशिक्षक सुधीर मुळे यांनी दिली.

स्टेशन डायरीपासून ते चार्जशिटपर्यंत….

पोलिस ठाण्यात सर्वप्रथम तक्रार दाखल होणारी एफआयआर, एनसी, अर्ज वा दिवाणी तक्रारी तसेच दैनंदिन संपूर्ण पोलिस स्टेशनमधील प्रत्येक महत्वाची घडामोड नोंद करणारी स्टेशन डायरी, तपास माहिती, न्यायालयात दाखल करावयाचे चार्जशिट, आवक-जावक नोंदी, बंदोबस्त, व्हिआयपी बंदोबस्त आणि रात्रीचा बंदोबस्त अशा प्रकारच्या माहितीचे मोठे काम ए-आय मुळे अत्यंत कमी वेळेत होते. या शिवाय तपास कामात तांत्रिक विश्लेषणही ए-आयमुळे खुप सोपे होत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचा-यांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें