शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी पुणे महापालिका निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
प्रभाग क्रमांक 38 मध्ये ईव्हीएम मशीन, सिम बदल, मतमोजणीतील राऊंडनिहाय विसंगती, नोटाला मिळालेली अनाकलनीय मते आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे आपला पराभव झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मोरे यांच्या म्हणण्यानुसार सातव्या राऊंडनंतर अचानक मशीन एरर दाखवून दोन मशीनची सिम कार्ड बदलण्यात आली, त्यानंतर मतांचे आकडे अनैसर्गिकरित्या बदलले.
तसेच काँग्रेसकडून मुद्दाम डमी उमेदवार उभे करून मतांचे विभाजन केल्याचा आरोप त्यांनी केला असून, या संपूर्ण प्रक्रियेत भाजपसोबत ‘सेटिंग’ झाल्याचा थेट आरोप केला आहे.
“हा पराभव जनतेचा नाही, तर मशीन आणि सेटिंगचा आहे,” असे सांगत वसंत मोरे यांनी मोठी कायदेशीर लढाई आणि मंगळवार-बुधवारी स्फोटक पत्रकार परिषद घेण्याचा इशारा दिला आहे.











