घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रसारक गगन मलिक यांचा समावेश आहे.

रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक राहुल डंबाळे व स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

पाली भाषेच्या संवर्धन व प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून, यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे.

पाली भाषेत अद्वितीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना हा सन्मान प्रदान केला जात आहे.या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि रोख रक्कम असा समावेश असून, संमेलनाच्या माध्यमातून पाली भाषेच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें