घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अमर एज्युकेशन सोसायटीच्या एस. पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

ध्वजारोहण, मार्चपास्ट आणि विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी वातावरण भारावून टाकले

पुणे | प्रतिनिधी :
अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस. पी. इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव पठार येथे सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. अरुण भाऊ सोकांडे सर व संस्थापिका सचिव सौ. मंगलताई सोकांडे मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. राहुल खिलारे साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन), माननीय श्री. चेतन जी. शर्मा ( पत्रकार पोलीस तपासक साप्ताहिक), माननीय सौ. सीमा युवराज बेलदरे (नवनिर्वाचित नगरसेविका), शाळा कमिटी चेअरमन माननीय रेळेकर सर तसेच माननीय श्री. वीर सर (पी.एस.आय.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले आणि उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध व देशभक्तीपूर्ण मार्चपास्ट संचलन विशेष आकर्षण ठरले.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, कविता, गीते, नृत्य व लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अमर सोकांडे सर व मुख्याध्यापिका माननीय सौ. पल्लवी अमर सोकांडे यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरिक बनावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमास शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें