विधानमुंबई शहरातील केईएम रुग्णालयाच्या नावाची गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या रुग्णालयाचे इंग्रजांनी दिलेले ‘किंग एडवर्ड’ हे नाव बदलता येईल का? याचा विचार मुंबई महापालिकेने करावा, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत वक्तव्य केले आहे.
संजय राऊतांनी एक फोटो पोस्ट करत मंत्री मंगलप्रभात लोढा यांना ते मुंबईतील त्यांनी बांधलेल्या ‘ट्रम्प टॉवर’ नावामधील ट्रम्प शब्द हटवावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलच्या नावातील किंग एडवर्ड हा शब्द हटवण्याची मागणी केली. तो शब्द त्यांना ब्रिटिशांचं प्रतिक वाटतो. मात्र मुंबईत हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात. लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा,” अशी पोस्ट राऊतांनी केली आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलच्या नावातील किंग एडवर्ड हा शब्द हटवण्याची मागणी केली. तो शब्द त्यांना ब्रिटिशांचं प्रतिक वाटतो. मात्र मुंबईत हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात. लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा.
मंत्री लोढा काय म्हणाले होते?
सेठ गोर्धनदास सुंदरदास महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभाच्या कार्यक्रमानंतर बोलातना लोढा यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत. केईएम रुग्णालयाचे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतिक आहे. किंग एडवर्डचा आपल्याशी काही संबंध नाही. हे नाव बदलता येईल का याबाबत मुंबई महापालिकेने विचार करावा, असे म्हटले होते. तसेच यासंदर्भात पुढील निर्णय पालिका प्रशासन घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी देखी लोढा यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की “जे मंत्री नावाविषयी बोलतात त्यांच्या प्रकल्पांची नावं आहेत लोढा बेलमोंडो, लोढा पॅलेजिओ, अल्टा माऊंट, कासा बेला, ट्रम्प टॉवर्स.. मग त्याऐवजी रामकुटीर, सीतासदन, लक्ष्मी निवास, अशी आपल्या मातीतील नावं का दिली नाहीत? पण सर्वसाधारण रुग्णांना आधार देणाऱ्या रुग्णालयाचं नाव बदलता तुम्ही. सर्वसामान्य रुग्णांना नाव माहितही नाहीत. ते केम रुग्णालय म्हणतात. हा ब्रॅण्ड आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.












