घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला

माहेरी यात्रा असल्याने घराला कुलूप लावून घरातील बाहेर गेल्यानंतर ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला मारला असून ४० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील वळसेमळा येथील शीला सोनु वळसे यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ करत तब्बल २८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवार(ता.२१)रोजी रात्री उघडकीस आली आहे,या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.निरगुडसर येथील वळसेमळा येथे निरगुडसर-अवसरी बुद्रुक रस्त्यालगत शीला सोनु वळसे पाटील या आपल्या बंगल्यात एकट्याच वास्तव्यास आहेत.

दोन दिवसांसाठी माहेरी यात्रा असल्याने वाफगाव (ता.खेड)येथे त्या गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्या बाहेर गेल्यानंतर ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करत चोरट्यांनी चोरी केली आहे. शनिवार (ता.२१) रोजी सायंकाळी शीला सोनु वळसे या घरी परत आल्यानंतर घराचे दरवाजे उघडे दिसून आले.आत प्रवेश करताच कपाटातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.

तपासणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले.चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये पाटल्या,बांगड्या,मंगळसूत्र,मोहनमाळ, अंगठ्या,बारीक मण्यांची माळ तसेच कानातील दागिने असा एकूण २८ तोळ्यांचा ऐवज समाविष्ट आहे.सध्याच्या सोन्याच्या दरानुसार ४० लाखाहून अधिक सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

पारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे म्हणाले की,चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला आहे तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ञ घटनास्थळी पोहचून तपास सुरू आहे.सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे.या चोरी झालेल्या घटनेच्या जवळच काही महिन्यापूर्वी रेवजी वळसेपाटील आणि प्रवीण वळसेपाटील या दोन घरात सोन्याच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें