घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तापकीर चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

काळेवाडी परिसरातील तापकीर चौक सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे चर्चेत आहे. हा चौक सकाळी आणि सायंकाळी नेहमीच ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावर केवळ अर्धा किलोमीटरचा प्रवास पार करण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात, अशी तक्रार अनेक वाहनचालकांनी केली आहे.

या चौकातून पिंपरी, एमआयडीसी, वाकड व हिंजवडीकडे मोठ्या प्रमाणावर नागरिक व कामगार जातात. परिणामी, हा मार्ग नेहमीच भीषण वाहतूक कोंडीने ग्रासलेला असतो.चुकीची सिग्नल वेळ आणि नियोजन, बीआरटी मार्गाची चुकीची आखणी व लोखंडी बॅरिकेड्स, गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, बेशिस्त वाहनचालक व नियमांचे उल्लंघन, अपुरे पोलिस कर्मचारी व प्रशासनातील समन्वयाचा अभाव, रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग, हातगाडी, फेरीवाले यासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अशा विविध समस्यांनी या परिसर वेढला गेला आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत आहे. यासंदर्भात महापालिका, वाहतूक व बीआरटी प्रशासनाने समन्वय साधून त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून वाढत आहे. अन्यथा, रोजचा प्रवास अधिकच कष्टदायक होईल, असा इशारा देखील स्थानिकांनी दिला आहे.

नागरिकांनी सुचविलेले उपायकायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकांची नेमणूकसंकेत फलकांची व्यवस्थाबेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाईअनधिकृत पार्किंग व अतिक्रमणावर नियंत्रणसिग्नल वेळांचे सुधारित नियोजनरस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें