घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेला देहव्यवसाय उघडकीस

विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अलीकडे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः शहरातील काही भागांमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर आणि अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. अशाच एका धक्कादायक प्रकरणाचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

विमाननगर परिसरातील दत्त मंदिर चौकाजवळ असलेल्या गुलमोहर रेजन्सी या इमारतीत सुरू असलेल्या ‘सिग्नेचर थाई स्पा’ या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक नागरिकांकडूनही या स्पा सेंटरविरोधात वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत विमानतळ पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला असता, स्पा सेंटरमध्ये पाच तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी मेहबूब खान लष्कर (वय २८, रा. आसाम) याला अटक केली.पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मेहबूब खान याने या तरुणींना जास्त कमाईचे आमिष दाखवून स्पा सेंटरमध्ये कामाला ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात मसाजच्या आडून त्यांना देहव्यवसायासाठी ग्राहकांकडे पाठवले जात होते.

ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतून आरोपी स्वतःची उपजीविका करत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का, इतर स्पा सेंटरचा यात सहभाग आहे का, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे पुण्यातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले जात आहे. पुण्यातील तरुणाई आणि शहराची प्रतिमा बिघडवणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें