घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली.चिखली परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आठवीत शिकणाऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार,मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होती. 17 मार्च रोजीरात्री नऊच्या सुमारास वडिलांनी तिचा मोबाईल तपासला होता. याचा राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते.

मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.मात्र, विवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पालकांनी मुलांशी संवाद साधताना काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें