घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

एक चिंचोका 1 लाखाला विकायचा… अशोक खरातने भाविकांना कसं लुटलं?

महिलांवर अत्याचार करणारा भोंदू अशोक खरातचे विविध कारनामे समोर येत असून, त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ज्याद्वारे तो लोकांना वेड्यात काढून त्यांची आर्थिक लूट करत असे व पैसा कमवत असे.आपल्याकडे येणाऱ्या हायप्रोफाईल भाविकांना तो चांगलेच लूटून घेत.

खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करायचा. आपल्याकडील कथित शक्तीचा वापर करत तो लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत असे. तो बाजारातून शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. ते चिंचोके कापडाने घासून स्वच्छ केल्यानंतर ते खड्यासारखे चमकायचे, हे चिंचोके खरात ऑफिसमध्ये येणाऱ्यांना मंत्र मारुन भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत विकायचा.

खरातच्या निकटवर्तीयांच्या FIR मध्ये याचा उल्लेख आहे.त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैसे उकळत होता. बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके ‘दैवी शक्तीचे’ असल्याचे सांगत खरातने त्यातील एक-एक चिंचोका तब्बल एक लाख रुपयांना विकलाचे तपासून समोर आलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

नाशिकरोड येथील एक व्यक्ती हे नकली खडे खरातला आणून देत असे.यासह खरात पाच इंच जाड व वेगवेगळ्या लांबीचे प्लॅस्टिकचा साप, वाघाची कातडी खरेदी करायचा. या साहित्यांद्वारे भाविकांना घाबरवायचा. त्यांच्याकडून पैशांची लूट करायचा. एकप्रकारे यातून खरात लोकांच्या भावनेशी खेळत होता.

दरम्यान, यापूर्वी खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात २८ वर्षीय पीडित महिलेने १७ मार्च २०२६ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयित भोंदू अशोककुमार खरातविरुद्ध बलात्कारासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. आता त्याच्याविरोधात आणखी दोन महिला पुढे आल्या असून त्यांनीही तक्रार नोंदवली आहे.

त्यामुळे सरकारवाडा पोलिसांत आणखी दोन गुन्हे खरातविरोधात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे.आज भोंदू बाबा अशोक खरात याच्या दृष्कृत्यांची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची देखील शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें