घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी डांबर

”जिल्हा परिषद अंतर्गतच्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांवरील कामांचा दर्जा चांगला राखण्यात यावा, त्याचबरोबर सर्व कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच २५ मेअगोदर पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागामधील दक्षिण आणि उत्तर दोन्ही विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत,” अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सोमवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत दिली. तसेच, शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर तातडीने अधिकारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते. अखर्चिक निधीच्याबद्दल बोलताना जगदाळे म्हणाले, ”यावर्षीचा अर्थसंकल्प हा ३०१ कोटी रुपयांचा आहे, पण तेवढा निधी खर्च झाला पाहिजे. आम्ही जास्तीत जास्त निधी खर्च करण्यावर भर देणार आहोत. शिवाय जे विभाग नेहमी दुर्लक्षित राहतात, त्यांच्याकडून निधी अधिक प्रमाणात खर्च होत नाही, अशा विभागांवर अधिक भर दिला जाईल.

येत्या काही दिवसांमध्ये सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात येईल. त्यामध्ये सदस्यांच्या विकासकामांचा आणि सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी सभापतींच्या निवडी झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुधारित अर्थसंकल्प मांडला जाईल.”दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या विभागांचे नेहमी आढावा घेत होते. त्यांनी शिक्षण आणि आरोग्यावर अधिक भर दिला.

त्यांच्या संकल्पनेतून सध्या जिल्ह्यात मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे सुरू आहेत. त्यामध्ये आता आणखी वाढ करून जास्त पटांच्या शाळांची निवड करून मॉडेल स्कूलच्या धर्तीवर विकसित करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर येत्या काळात जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३०० शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येईल.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें