घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

घरात बोअरवेल घेतली अन् थेट मेट्रोत गळती! पुण्यात नेमकं काय घडलं.

घराखालून भूमिगत मेट्रो मार्गिका गेली असल्याची माहिती असताना एका घर मालकाने कूपनलिका (बोअरवेल) घेतल्याने स्वारगेट-पिंपरी भूमिगत मेट्रो मार्गिकेत पाणी गळती झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात ही घटना नुकतीच घडली. त्यानंतर मेट्रोतील अधिकाऱ्यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एका घर मालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक (स्थापत्य अभियांत्रिकी) शंतून गोरात्रा यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खडक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या घर मालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट ते पिंपरी मार्गिका भूमिगत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या मेट्रोचा मार्ग भूमिगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन जाणारी ही मार्गिका भूमिगत आहे.

स्वारगेट मंडई, कसबा पेठ, शिवाजीनगर न्यायालय, शिवाजीनगर एसटी स्थानक ही स्थानके भूमिगत आहे. खडकी रेंजहिल्स ते पिंपरी दरम्यान मेट्रोचा मार्ग उन्नत आहे.छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर खडक पोलीस ठाणे आहे. खडक पोलीस ठाण्यासमोर शुक्रवार पेठेतील घर क्रमांक ४१५ आहे. या वाड्याच्या मालकाने बोअरवेल घेतली. भूमिगत मार्गिका घराखालून जाते, याची माहिती घरमालकाल होती.

१४ मार्च रोजी भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या एका भागातून (मास्क) पाणी गळती सुरू झाली. मेट्रातील अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली. घराखालून मेट्रो मार्गिका जात असल्यचाी माहिती असूनही बोअरवेल घेण्यात आली. त्यामुळे बोगद्याच्या एका भागाला छिद्र पडले. या छिद्रातून मेट्रो मार्गिकेत गळती झाली.

मेट्रो मार्गिका राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निधीतून साकारण्यात आला अहे. घरमालकाच्या कृत्यामुळे मेट्रोच्या मालमत्तेची अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असलेल्या खडक पोलीस ठाण्यासमाेरील एका वाड्यात बोअरवेल घेण्यात आली होती. बोअरवेलमुळे मेट्रो मार्गिकेत पाणी गळती झाल्याने मेट्रोकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. – शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें